STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

||आठवण दिपावलीची ||

||आठवण दिपावलीची ||

1 min
224

आजच्या तरूण पिढीला नाही माहीती पहाटे उठणे 

नको म्हणता लाऊ अंगाला तेल उटणे 

आजी मग ओरडते बस पाटावर दाखवते लाटणे 

घालायला सांगते पांढरा पायजमा झब्बा

 समोर लाडूचा भरलेला डब्बा 

आजी डायेट चालले माझे, एवढ्या पहाटे खाउ तरी कशी 

नको तो आल्याचा फक्कड चहा, झकास कर कॉफी 

धावायची करायची कसरत, मिळवायची ना गं मला ट्रॉफी 

नको तुझे उप्पीट पोहे, कर मस्त पास्ता 

पिझ्झा बर्गरचा मला हवा नाश्ता 

दिवाळीच्या सणाला व्हायचे हजर घराघरात सगळी 

मोबाइल कंप्युटर मुळे दुनियाच झाली वेगळी 

फराळाचे डबे तसेच पडले भरुन 

खारा बेत करू, खाउ ताव मारून 

आत्या मावशी सणाला यायच्या घरी,

भरून जायचे घर आता म्हणतात

न भेटता मोबाइलवर मेसेज कर 

क्षणाचा तो आनंद नाही होत मनाला,

ओसाड झाले मन, 

आशेने आजी आजोबा वाट बघता

कसा साजरा होइल पुर्वीसारखा दिवाळी सण ॥


Rate this content
Log in