STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

3  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
171

आत्म्याच्याच विचाराने

मनी धरावा विश्वास।

ठाम असावा निर्णय 

जसा र्‍हदयाचा श्वास॥१॥


आत्मियता सत्यवादी

विचारांची बांधाबंध।

नको मनी धडधड

आणि लाचारिची सांध॥२॥


ठाम निर्णय असावा 

कार्यभार ओढताना। 

सत्य वचन मुखात

समाजात बोलतांना॥३॥ 


फार तोलून मापुन

व्हावा शब्दांचा वापर 

व्यर्थ अंदाज भ्रमाचा 

डोई चुकीचं खापर॥४॥


म्हैस पाण्यात असता 

नको विचार सौद्याचा।

सत्यवाद संतधार

जसा उगम नद्यांचा॥५॥


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை