आत्मकविता
आत्मकविता
कथा वाचण्याचा होता मला होता छंद....
विचार केला लिहून पाहू नाही झाले लिखाण तर करू बंद .....
टाकले पहिले पाऊल सुरुवात केली सावकाश .....
हळू हळू लिखाण करून सामावुन घेऊ अवकाश .....
पहिली भयकथा प्रकशित केली नाही आला प्रतिसाद बरा....
कुमार राव राहू द्या लिखाण तुम्ही वाचनच करा .....
डोक्यातून काही केल्या लिखाणाचा विचार जाईना......
पाहू का अजून एक लिहून मनाला चैन काही येईना ......
मी लिहिली दृष्टचक्र माझी दुसरी कथा .......
ज्यामध्ये भुतिया मिल ची मांडली व्यथा .........
कथा प्रेक्षकांना पडली पसंत .......
अजून कथा येऊ देऊ म्हणून नाही घेतली उसंत ......
दीर्घ कथा लिहिता लिहिता वळलो लघु कथा कडे .....
ह्या पण कथा लोकांना आवडू दे म्हणून घालू लागलो देवाला साकडे .....
माझी दुसरी कथा प्रथम यूट्यूब ला आली .....
लोकांना तिकडे पण ती खुप भावली .....
हळू हळू लोक लागले मला विचारू ....
कसे लिहिता तुम्ही कथा म्हणजे आम्ही पण सुरुवात करू .....
मदत मी त्या लोकांची लिहायला .......
कथा त्यांची पण प्रसंग होतो मी रेखाटायला ......
प्रत्येक प्रसंग होते ते लिहीत घेऊन माझा सल्ला ......
मला हे नव्हते माहित मला तोंडावर वाघ बोलणारे मागे बोलत होते कोल्हा .....
केली मी मदत हर प्रकारे त्या नवीन लेखकांची ......
ज्यांनी प्रसिद्ध झाल्यावर साथ सोडून दिली माझी ......
झालो आम्ही प्रसिद्ध झाले तुझे काम ......
असे बोलून त्यांनी केला मला राम राम ......
तेव्हा पासून ठरवले ना कोणाशी देणे ना घेणे .......
आपण आपली कथा फक्त लिहीत जाणे ........
आहे हे माझ्या बाबतीत घडलेले पूर्ण सत्य ......
काय सांगू तुम्हाला कसा झालो मी व्यक्त ........
नसतो कोणी आपला ना इकडे सखा .......
कारण ज्यांना आपण आपले मानतो तोच तर देतो नंतर धोका .......
लेखन माझे स्वप्न आहे आणि त्यात मी आहे जगत .....
बाकी माझ्यावर जळणारी जी माकड आहेत त्यांनी राहावे माझे यश बघत .......
कविता नाही आहे हा आता पर्यंत माझ्या सोबत झालेला खेळ ......
म्हणून सांगतो मदत जपून करा नाही तर येईल माझ्यासारखी वेळ....
