आत्महत्या...
आत्महत्या...
हल्ली आत्महत्या दुःखाची बाब की ट्रेंड झालाय ते कळेनाच झालंय...
एक दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. कारण अद्यापही समजले नाही. दहावी ची मुलगी म्हणजे पंधरा ते सोळा वर्षाची. असे कोणते आभाळ कोसळले असावे की आत्महत्या सारखा पर्याय सोपा वाटला...
तुम्हाला जन्म देताना त्या मातेने किती वेदना सहन केल्या. तुमच्या बापाने किती कष्ट उपसले याची जाणीव नाही का? मायबापाच्या डोळ्यात कायम अश्रू साठवून देण्या इतपत काय टेन्शन आहे? निसर्गाने एक खूप मोठी चुकी केली. मरणानंतर मेलेल्या व्यक्तीला त्यांच्या माय बापाची अवस्था काय होते ते दहा मिनिटे बघू देण्याची सिस्टीम ठेवायला हवी होती. मग त्या मुलीला आणि मुलाला जाणीव झाली असती. डोळे उघडे करून मरताना तुम्हाला काही वाटत नाही. पण आयुष्यभराच दुःख डोळ्यात साठवून राहणे तुमच्या माणसाला किती यातनादायक असते हे तुम्हाला कळायला हवे होते.
म्हणतात या जगात सगळ्यात मोठे तीन दुःख आहेत...
एक दूध पिणाऱ्या लेकरांची माय मरने
दोन ऐन तारुण्यात आलेल्या लेकरांचा बाप मरने
आणि तीन, माय बापाच्या साठीत त्यांचा तरुण पोरगा मरणे...
आणि तुम्ही हाताने तिसरे दुःख तुमच्या आईवडिलांना देत आहात...
ज्यांची दोन वेळची जेवणाची सोय नाही ते सुद्धा जिद्दीने जगत आहेत. मग तुम्हाला कोणते टेन्शन येते की आत्महत्या हाच पर्याय दिसतो.
परीक्षेत कमी गुण आले, प्रेमभंग झाला, mpsc, upsc अटेम्प्ट निघत नाही, नापास झाले...
परीक्षेत कमी गुण आले तर गुणवत्ता घसरते का?? पुढच्या वेळी अजून जोमाने अभ्यास करा, प्रेमभंग झाला तर आईवडिलांच्या प्रेमात पडा, तिथून कधीच भंग होणार नाही, mpsc, upsc निघत नाही मग परत परत प्रयत्न करा, ते नसेल जमत तर शेती करा, दुसरे एखादे काम बघा...तुमच्या जगण्यासाठी पर्याय असून सुद्धा तुम्ही पर्याय शोधत नाही मग मरणासाठी का आत्महत्या हा पर्याय निवडता???
लहान सहान गोष्टी मुळे जर तुम्ही मरत असाल तर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घातले हेच चुकी केली. मरण्यापूर्वी फक्त एकदा एक रात्र घराबाहेर आईवडिलांना न सांगता राहा. त्यानंतर तुम्हाला शोधण्यासाठी त्यांची किती वणवण असते हे बघा आणि नंतर मरण्याचा, आत्महत्या करण्याचा निर्णय घ्या. मरण्यासाठी भरपूर कारणे आहेत हो पण ज्यांनी जन्म दिला ना त्यांच्यासाठी जगा...
माझे मत मला अस वाटत
