आता पाऊस पडेल!
आता पाऊस पडेल!
1 min
1.5K
आता पाऊस पडेल
सगळी गरमी दूर होईल,
मातीचा सुगंध येईल.
सगळीकडे बेडूक डराव-डराव करतील,
आता पाऊस पडेलं !
शेतातून पिक मिळेल,
शेतकरी आनंदी होईल
शेत हिरवेगार होईल,
हिरव्यागार शेतात पशु - पक्षी वावरतील,
आता पाऊस पडेलं !
मूल पावसात खेळणार,
मूलं पावसाचा मजा घेणार.
मूलं पावसाची गाणी म्हणणार?
पावसात खेळतांना गरमी दूर होणार.
आता पाऊस पडेल !
शाळेला सुट्टी मिळणार,
दिवसभर घरी राहणार
गरम भजीया खाणार,
भजीया खातांना इंद्रधनुष दिसणार,
आता पाऊस पडेल !
