STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

आता मला सारंच कळतं

आता मला सारंच कळतं

1 min
61

दुडूदुडू धावत होतो

धावतांना पडत होतो

'लागले का रे उठ बाळा'

कुणीतरी म्हणत होतं

तेव्हा मी लहान होतो

मला काहीच कळत नव्हतं


'पहाट झाली उठ बाळा'

प्रेमाने उठवित होतं

वाफाळलेला गरम चहा

हातामध्ये देत होतं

तेव्हा मी लहान होतो

मला काहीच कळत नव्हतं


पाटावर बसता क्षणी

ताट समोर येत होतं

गरमागरम खरपूस पोळ्या

ताटामध्ये वाढत होतं

तेव्हा मी लहान होतो

मला काहीच कळत नव्हतं


'शाळा भरली चल बाळा '

बोट धरून नेत होतं

खाऊसाठी थोडे पैसे

हातावर ठेवत होतं

तेव्हा मी लहान होतो

मला काहीच कळत नव्हतं


नोकरी लागली लग्न झालं

लिंबलोण उतरत होतं

इडापिडा टळो सारी

सारखं कुणी म्हणत होतं

तेव्हा मी लहान होतो

मला काही कळत नव्हतं


आता मी एवढा मोठ्ठा

सगळच कसं इझी असतं

वृध्दाश्रमाची फीस् भरणं

आता मला सोपं वाटतं

आता मी मोठा झालो

आता मला सारंच कळतं


Rate this content
Log in