STORYMIRROR

Manisha Patwardhan

Others

3  

Manisha Patwardhan

Others

आषाढी २०२०

आषाढी २०२०

1 min
6

इथेच माझी आषाढी, अन् इथेच माझी पंढरी

दुरून दर्शन घेतो देवा, कृपा करी रे.. मजवरी॥धृ॥


जगात पापे भारी वाढली

ताळतंत्र, ना कुणी सांभाळी

म्हणून देवा देतो कां रे, शिक्षा असली जडभारी?॥१॥


गरीब सारे कसे भरडले

मध्यमवर्गीय असे चिरडले

थोरामोठ्यांची गोष्ट भारी, असते ती रे जरतारी॥२॥


नोकरी गेली, पैसाही न उरला

पोटाला तर, चिमटाच बसला

फिरवू कशी रे कुटूंबियांच्या, पोटावर मी अशी सूरी॥३॥


Rate this content
Log in