STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

आसमंत

आसमंत

1 min
468

खुले आसमंत लाभणं 

म्हणजे विश्वासाची नांदी 

स्वच्छंदी भिरभिरणं आकाशी 

 म्हणजे तोच खरा आनंदी 

विचारांची मुक्त उधळण करून 

व्हावे सामिल या युद्धात 

मौन न बाळगता रणांगणात 

उत्तरावे स्पष्ट शब्दांत 

मिळाला आदर विचारांना 

नसे त्याहून काही श्रेष्ठ 

चाचपडत न जगता दाखवा

ताठ मानेने जगण्याचे धारिष्ट्य


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை