आशाकिरण
आशाकिरण
1 min
223
आत आत रोज कोण बोलत राहतं
काहीतरी चुकतंय हो सांगत राहतं
अंग मोडून काम करतोय ना मी रोज
तरीही महत्वाचं काही खुणवत राहतं
कशीबशी दिवसाची होते बरी सुरवात
रात्र होताच कसं सगळं पसरत राहतं
नव्याने रोज नवी गणितं बांधतो मी
हिशोबात बसणारं तेच निसटत राहतं
आवरून ठेवावा काय विस्कटलेला संसार
एकहातीच मन प्रश्न विचारत राहतं
साथीला बसलेले नेमके वेळेलाच पांगले
पाठीशी कोण मन विवंचना करत राहतं
कसे करावे संस्कार ह्या दूरच्या नात्यांवर
नातंच नाममात्र जीथं असं विरहत राहतं
फुलांसारखा उमलून येतो पुन्हा क्षण नवा
चेतनच्या गझलांना आधार देत राहतं
