आशा .....!
आशा .....!
1 min
144
लकवा मारलेल्या
माझ्या देशाच्या ....
सर्वांगाला
रोज करतोय मी फिजिओथेरपी ,
करतोय व्यायामांचे विविध प्रयोग
मसाज वाफाऱ्यांसहीत ....
कधीतरी
या गलितगात्र शरीरात
चेतना येऊन ऊर्जा येईल
अन
पुन्ह्यांदा वाहू लागेल
सोन्याचा धूर
धुरांड्यातून ....
परीवर्तनातून
येतील सुगीचे दिवस
सोनं उगवेल ;
हिरे मोती उगवतील .....
अच्छे दिन येतील ,,,,
या भोळ्या आशेवर ....!
