आस
आस
1 min
147
तुझी आठवण काडून पावसा
बेजार जीव झाला होता
आनि सकाळी सकाळी सात वाजता
अंगरखा हा चिंब घामाने भिजला होता
प्रत्येक ढगांमध्ये तुला शोधताना
पिकाच्या जीवाची आस होती
तू नाहीस पडलास तर पावसा
शेतातल्या पिकांची राख होती
थोडातरी पडशील म्हणून
आनि देशील जीवाला जीव पावसा
जगण्याची हिंमत माझ्या पिकाला
एवढा ठाम विश्वास होता
तू येणार म्हणून सांगताना
विश्वासाने छाती फुगत होती
मात्र तुला वेळ देताना पावसा
जीवाची घालमेल होत होती
तू पण पावसा आत्ता आगलीकच करतोस
माणसाच्या मनाप्रमाणे तू पण कुठेही कसाही भटकतोस
आम्ही कुठे म्हणतो तुझेंच चुकते
पण पावसा बघ की सारे कसे इस्टकटले
