STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

आरती देवीची

आरती देवीची

1 min
409

जय आदिमाते, हे जय अंबे माते।

संहारुनी दैत्यांना, दे अभय आम्हा माते॥


दुष्टांची निर्दालक, सुष्टांची पालनकर्ती।

तुझ्या कृपेने देवी आमची भयदु:खे हरती।

तूच वाचवी आम्हांस माते।

 लेक मी तुजला विनवीते॥  

संहारुनी दैत्यांना, दे अभय आम्हा माते॥


तूच शक्ती, तू भक्ती, माते, जन तुजला पूजिती।

स्मरणे तुझिया इहलोकीची पापेही  जळती।

पामर आम्ही शरण तुला गे ।

रक्षुनी बळ दे आम्हांते॥

संहारुनी दैत्यांना, दे अभय आम्हा माते॥


शिवगौरी तू , तूच पार्वती, तू जगद्धात्री।

महाकाली तू , देवी चंडिके , तू कालरात्री।

दुर्गे देवी, हरुनी दुर्गती ।

 करी रक्षण त्राते॥


जय आदिमाते, हे जय अंबे माते।

संहारुनी दैत्यांना, दे अभय आम्हा माते॥


  


Rate this content
Log in