आरसा
आरसा
1 min
223
भाव मनाचे प्रकटती चेहऱ्यावर
नानारंगी रूपे विश्वातील
दाखवी आपणास आरसा
शुभ्र सौंदर्य वा मूर्ती सावळी
खरेखुरे चित्र बिंब उजळे
प्रतिमांचा खेळ सारा
भाव अनेक दाखवी आरसा
हसता हसता हसतो
रडताना तोही रडतो
ओळख पटवतो स्वतःची
एकटेपणात मित्र बनतो आरसा
खचलो कितीही आयुष्यात
धीर येतो त्यात पाहताना
कधी कधी बघता बघता
लढ म्हणतो आपणास आरसा
