आरसा
आरसा
1 min
132
तुझ्या अंतर्मनाच्या आरशात
पाहिले मी स्वतःला
तुझे माझ्यावरचे नितळ प्रेम
दिसले स्पष्ट माझ्या मनाला ......
तुझ्या खऱ्या प्रेमाची
झाली मी दासी
विचारते मी आरशाला
सांग दिसते मी कशी ?........
तुझ्या समोर येण्या आधी
आरशात न्याहाळते मी स्वतःला
माझेच प्रतिबिंब चिडवते रे
बघ तुझ्या नावाने मला.......
सजते सवरते वेडी मी
आरशापुढे सतत बडबडते
काय ? बोलायचे तुला हे पण मी
आरशा समोर सराव करते......
गंमत बघ कशी आहे
आरशालाच मी सख्या मानते
तुझ्या आधी गुप्त मनातील
माझ्या भावना आरसा जाणते......
