आरोग्य
आरोग्य
उत्तम आरोग्य हीच गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची
सुदृढ शरीर हमी देते आपल्या दीर्घायुष्याची
चांगले स्वास्थ असणे हीच अनमोल संपत्ती
योग्य आहार विहार हेच उत्तम आरोग्याची युक्ती
आरोग्यावर होणारा कमी खर्च नियोजनाचा व
नीतिमूल्याचा अभाव
प्राथमीक आरोग्य सुविधा देताना तोकडे
वैद्यकीय मनुष्यबळामुळे आरोग्यावर पडे प्रभाव
म्हणून आपल्या आरोग्याची
घ्यावी आपणच काळजी
स्वच्छ असावे घर असावा स्वच्छ परिसर
नित्य करावी कसरत असावे आहाराचे परिपत्रक
दैनंदिन व्यायामाने होईल चांगल्या आरोग्याची प्राप्ती
नित्य प्राणायामाने मिळेल शारीरिक मानसिक शांती
आपले आरोग्य आपल्या हाती
तिच खरी मिळकत, धनसंपत्ती
पोषक असा घ्यावा आहार
फास्ट फूड चा न करावा विचार
चटक-मटक चा न करता मोह
उत्कृष्ट असा घ्यावा फलाहार
व्यायाम करावा प्रत्येकानी सगळ्यांचा हा फायद्याचा
मनाचा सुद्धा ठेवावा संयम यावर भार आरोग्याचा
वेळचे ठेवावे नियोजन झोप ,सर्व कामे
अतिरेक टाळावा विज्ञानाचा थोडे जगावे निसर्गाच्या नामे
मन करूनी प्रसन्न काळजी घ्यावी स्वतःची
शरीराचे आरोग्य म्हणजे किल्ली सुखी जीवनाची..
