आरंभ
आरंभ
हरलेला तो मिच, आता पुन्हा उठलो आहे.
कलम हाती घेऊन, कागदावर पेटलो आहे.
शब्दफुलांच्या माळा ओवीत, असा लेटलो आहे.
अन्यायाचा प्रतिकार म्हणून, आग ओकतो आहे.
नवी पहाट घेऊन, कंठ माझा फूटतो आहे.
तेज रवीचे पाहून, अंधार लपतो आहे.
संघर्षरान चालून, जिथे पाय झीजतो आहे.
जिंकण्याच्या दिशेने, आता मार्ग सुचतो आहे.
सोळा विद्या आणी चौसष्ट कलेचाच, हा रंग आहे.
लिहिणाऱ्याच्या मुखी, आधी गजाननाचा प्रारंभ आहे.
भीती कश्याची, जेव्हा पाठीशी हेरंभ आहे.
काबीज करण्या यश, हाच खरा आरंभ आहे.
