STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

आपत्तीकाल

आपत्तीकाल

1 min
167

नाही जायचे कुठे, थांबायचे घरी येत जात नाही कुणी कुणाच्या दारी 

करत आहेत मोबाइलवर चॅटिंग नात्याची पुरती उडाली बॅटींग 

चांगल्या काळात सणाला भेटायला यायचे नातलग, भासायचा मोठा सण कोरोनाच्या काळात नाही भेटगाठ, वाटते आहे भणभण 

खाणं, झोपणं व्यर्थ वेळ वाया झाला आळशी घरचा धनीराया 

दाढी न करता भासवत आहे सिंहाची आयाळ लाडीक तक्रार स्त्रियांची, राकट स्पर्शाने होत आहे घायाळ 

नारीचा तो नखरा, लपला मास्कखाली उडाली गोर्‍या गालावरची लाली 

मनाची वाढते घालमेल, अकाली आले म्हातारपण निघून जाऊ दे संकटकाळ, होउ दे तरतरीत प्रत्येकाचे मन


Rate this content
Log in