STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

आपल्याला पाहिजे तसा

आपल्याला पाहिजे तसा

2 mins
312

आपल्याला पाहिजे तसा

मित्र मिळतो काही दिवसा

पुरता असतो खूप देऊन

जातो तोच मित्र आयुष्य भर

लक्षात राहतो.....


आपली मैत्री ही अनोळखी असते

तिच्यावर विश्वास बसत नाही

तो पर्यंत अविश्वास दाखवतो

पूर्ण आत्मविश्वास वाढला की

तो आपली भूमिका पार पाडतो.....


काही मित्र जीवाला जीव

लावणारे असतात ते बोटावर

मोजणारे असतात ते भेटले की

दिवस बोलायला तास ही

कमी पडतात...


काही मित्र इतके काळजी

करतात की घरी जाईपर्यंत

फोन करतात आणि विचारतात

पोहचला का भावा.....


काही मित्र चूक झाली तरी

समजून सांगतात रागवला

तरी त्याला पश्चात्ताप होतो

उगीच बोललो त्याचं मन

असेल दुखत....


आपल्यात एखाद्या मित्र

असा असतो की त्याला

कळलं की खूप आजारी

आहे तो लगेच धावत येतो.

कारण त्यांनी आपल्यासाठी

खूप काही केलेले असते

ते नाही विसरत अन बोलू

नाही शकत...


मित्र असे असतात की

कुठे फिरायला गेले की

बोलतात आपला अजून

एक मित्र आला असता

खुप मजा केली असते....


कांही मित्र आपली आपण

एखाद्या कार्यक्रमाला नाही

आला की नाराज होतात

रुसुन बसतात आणि

बोलतात त्यानी येईला

पाहिजे होतं.....


काही मित्रांचं नशीब असं

असतं की मित्र असेपर्यंत

त्याला त्यांची किंमत कळतं

नाही साथ सोडून निघून

गेल्यावर त्यांची आठवण

करून काय फायदा......


काही मित्राना असे मित्र

भेटतात रेल्वे स्टेशनला

कुणाला कंपनीमध्ये

कुणाला हॉटेलमध्ये

कुणाला कार्यक्रमात

कुणाला फेसबुकवर

कुणाला प्रतिलिपीत

शेवटी मैत्री ती मैत्री असते....


इतके मित्र असूनही

शेवटच्या अग्नी डाग

देईपर्यंत असतो तोच

खरा मित्र आपला असतो


ह्यालाच नशीबवान

मित्र मिळतो हाच

आपल् मन सतत

जिंकत असतो...


Rate this content
Log in