आपली प्रीत
आपली प्रीत
1 min
123
तू आलास कोठून
ठाऊक नाही मजला
तुझ्याशी बोलताना
दिवस ही अपूरा पडला
शब्द तुझे चांदण्याचे
मेघा ला उजळून गेले
सूर तुझे रेशमी
मनाला बांधून गेले
संदेश तुझ्या प्रेमाचा
मनी मनांत रूचला
तू रसिक होऊन माझा
इंद्रधनुत रंगला
माझीया शब्दांत आहे
तुझीया साठीचं गीत
मिटून नयन तुझे
आठवावी तू आपली प्रीत
