STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

आपला परका

आपला परका

1 min
200

कधी कधी काय चालू, काय काही समजत नसतं.

फक्त चेहऱ्यावर हसू ठेवलं, म्हणून जग उगीच फसतं.


फसतात ते परके, आपले लगेच ओळखतात.

काही सांगायच्या बोलायच्या आत, मदतीला धावतात.


सगळेच चांगले किंवा सगळेच वाईट, कधीच नसतात.

पण जे पाठीशी सतत ऊभे, तेच मात्र खरे असतात.


बाकी उगीच गर्दी आणी, दाखवायची असते दर्दी.

माणसांच्या गर्दीत आता, माणसांना माणसांचीच झालीय सर्दी.


जवळीक दाखऊन आपुलकीची, घातपात दगाफटका करतात.

चार चौघांत सल्ला देणारे, पाठीमागे मनसोक्त नावे ठेवतात.


फरक कोणालाच काही, आणी कधीच पडत नाई.

चमत्कार करणाऱ्यांच्या पुढ्यात, मग गर्दीला चांगला ऊत येई.


कितीही बोला वाचा ऐका, काळजी घ्या बरका.

कलयुगात कधीच कळणार नाही, कोन आपला कोन परका.


Rate this content
Log in