Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

आपला महाराष्ट्र

आपला महाराष्ट्र

1 min
339


मराठमोळे दागदागिने,विविध सणवार

महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध करतात

व्रतवैकल्ये, लग्नाचे विधी, पाककृती

सारे संस्कृतीची कीर्ती वृद्धिंगत करतात १


शिरपेच खोवलेला शिवाजी महाराजांनी

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांनी

संत साहित्याची अध्यात्मिक धुरा पेललेली

ज्ञानेश्वर,तुकारामांच्या भक्तीमय अभंगांनी २


संस्कृतीचे दालन वेरूळ,अजिंठा लेण्यांचे

पंचवटी,दंण्डकारण्य महाराष्ट्राच्या भूमीचे

आजही भिलार गाव बहरले आहे पुस्तकांनी

नि कोल्हापूर,तुळजापूर मायमराठीच्या देवींचे ३


महाराष्ट्राची शान भारतरत्न लता मंगेशकर

नि अभिमान क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर

स्वातंत्र्यवीर फुले,टिळक,आंबेडकर,सावरकर

राजधानी मुंबई तर आहे जगाच्या पाठीवर ४


मायमराठी सजवली थोर,दिग्गज साहित्यिकांनी

पु.ल.,अत्रे,शिरवाडकर,माडगूळकर,खांडेकरांनी

स्त्रियांसाठी ज्ञानदीप पेटविला सावित्रीबाईंनी

मराठा तितुका मेळविला संत रामदासांनी ५


साड्यांची राणी पैठणी महाराष्ट्राची आहे शान

नऊवारी साडी,नथ,धोतराचा कपड्यांमध्ये मान

थंड हवेच्या ठिकाणांचा जगभर सन्मान

तीर्थक्षेत्रे,अष्टविनायक आहेत महाराष्ट्राला वरदान ६


सह्याद्रीच्या पर्वरांगांमध्ये संस्कृती आहे वसलेली

शिक्षणाने सर्वांच्या मुखातून चांगली नावाजलेली

आमटे कुटुंब समाजसेवेचा वसा घेतलेले

सर्व जिल्ह्यांत संस्कृतीची भाषा ओथंबलेली ७


महाराष्ट्राच्या संस्कृतीला आहे पगडा

रूढी,परंपरा आणि अठरापगड जातींचा

त्यातच अंधश्रद्धा नि व्यसनाधीनतेच्या विळख्याचा

तरीही सुगंध दरवळतो मायमराठीच्या मातीचा ८


अशा दिमाखदार महाराष्ट्राची शान आपण वाढवूया

बहरलेले संस्कृतीचे दालन सर्वांनी मिळून फुलवूया

नवीन तंत्रज्ञानाने शिक्षणाचे महत्व वाढवूया

आणि जातीभेद, दंगेधोपे विसरून एकदिलाने राहूया ९


Rate this content
Log in