....आणि पाऊस बोलू लागला
....आणि पाऊस बोलू लागला


टपटप करणाऱ्या पाउसाला विचारले मी एकदा
नाही तू पडत पूर्वी सारखा
म्हणतात आजी आजोबा आमच्यावेळीचा पाऊसच होता वेगळा
खरंच तू बदला आहेस का ?
पाऊसाने दिले उत्तर मला
ठेवली आहे का तुम्ही हिरवीगार झाडे मला बरसायला ?
ठेवले फक्त कॉर्किटच्या इमारती आणि तांबडी माती पाहायला
पूर्वीसारखी येतात का मुलं कागदी होडी सोडायला ?
बालपण अटकलंय त्याच मोबईलात
पूर्वी सारखा घरात दरवळतो का वास भज्यांचा बसतो का माणसाचा गप्पाचा कट्टा ?
आता वेळ नाही घरातल्या घरात बोलायला तुम्हाला
घराची जागा फ्लॅट अपरटेंमेंट नि घेतली
पाऊस चा आंनद कसा घ्याल तुम्ही बंद दरवाजी
आता तुमीच सांगा
तुम्ही माणसं बदलीत मग मी नको का बदलायला ??