आनंदमय श्रावण
आनंदमय श्रावण
1 min
242
श्रावण मासाचे झाले आगमन
सरींची सोबती आली स्वारी
हिरव्या गार निसर्गाची बघा
ऐट कशी दिसतेय भारी।।
अवतरल्या धरेवर श्रावणसरी
आला फुलापानास बहर
मोहक कोवळ्या फुलांमधुनी
गंध चोरतो हळूच भ्रमर।।
रिमझिम पावसाच्या सरींतून
हळूच डोकावले ऊन कोवळे
श्रावणाचे वेध लागता मनी
सुरु झाले कडक सोवळे।।
कोसळणाऱ्या श्रावण सरींतून
फुलली आज नवी सकाळ
दवबिंदूच्या मोहक रूपातून
सजली पानाफुलावर माळ।।
