STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

4  

Prachi Kulkarni

Others

आनंदाश्रम

आनंदाश्रम

1 min
348

माणसाचे झालेय घड्याळ 

नुसत्या भौतिकामागे पळून 

मात्र उर फुटेपर्यंत धावताना

आयुष्य गेलेय होरपळून

सगळे झाले आहेत,

 यंत्रांच्या स्वाधीन

शरीराचे ओझे वाटावे 

इतके हलके झालेय

प्रत्येक यंत्र....

कोणतेच श्रम न करता 

कुजली आहेत शरीरे

भोगल्या विषयांनी,

 पण

कष्ट हवेत जीवाला

सुदृढ राहण्यासाठी,

शरीराच्या अमूल्य यंत्राला ,

जपण्यासाठी

तरच होईल हे जग

आरोग्यदायी आनंदाश्रम

याचसाठी , रोज करावे परिश्रम


Rate this content
Log in