आनंदाची उधळण
आनंदाची उधळण
1 min
588
आला आला गं सयांनो
रंगपंचमीचा सण
खेळू उडवू या रंग
आनंदाची उधळण
जमू सारे एकजुटी
उधळण्या सप्तरंग
नामा शिवा ताना बाजी
वाटू खुशीचे तरंग
दिस आलेत सुखाचे
जपू हृदयात क्षण
नको मनावर ओझे
मणभर असे घण
मुक्ती तणावातुनही
वागू स्वच्छंदी निर्भय
घोट सुखाचा पिऊनी
जगू मस्त सहृदय
दिनरात राबताना
घेऊ मुखे हरिनाम
स्मित फुलता वदनी
मिळे संचिताचा दाम
