आनंदाचे झाड
आनंदाचे झाड
1 min
651
आनंदाचे झाड एक माझ्या अंगणी,
प्रेमाची मुळे त्याला, मायेचे पाणी.....💫
पावसाची सोबत त्याला दुःख विसरायला,
धरणीची साथ त्याला संघर्षात तरायला.....💫
पानाफुलांची सोबत त्याला,सौंदर्याचा साज त्याला,
किरणांच्या मदतीची अनामिक साथ त्याला....💫
आनंदाच्या झाडावर दुःखाचे किडे,
ते दुःखाचे किडे हटवायला त्यावर ऊन-पाऊसाचे सडे.......💫
चला शिकूया या आनंदी झाडासवे,
गाठूया लक्ष्य आपुले बनुन ध्येयाचे थवे....
