आनंद
आनंद
1 min
174
जीवना दिले आईबाबांनी
खूप खूप मजा सारे लुटूया
नको द्वेष नको रागराग कोणाचा
सारेजण आनंदाने आपण राहूया.....
गुरूजनांचा मान आपण राखूया
बोलताना शब्दांचे भान ठेवूया
भावना जागृत ठेवूनच वागूया
आचरणात नम्रपणा बाळगूया....
आनंद या जीवनाचा उपभोगूया
दुःखावर मातही आपण करूया
आनंदाचे धन इतरांना वाटूया
जीवनी मोदाचे,हर्षाचे क्षण आणूया.....
मित्रांच्या अडीअडचणीत मदत करू
वृद्धांच्या अडचणी समजावून घेवू
शत्रूशीही गोडीगुलाबिने वागूया
जीवनातील आनंद सदैव जीवंत ठेवू....
