STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

आनंद-दान

आनंद-दान

1 min
274

पक्षी करिती चिवचिवाट 

उगवली ही रम्य पहाट

झाडांवरती गाणी गातात

कौतुकाने सृष्टीचे हे भाट


मन जाहले अतिप्रसन्न

दु:ख शमले , सरले दैन्य

ऐकताच हे सृष्टीचे गान

जीवन वाटले झाले धन्य


तरंगे मनीं सुखाची लाट

पक्ष्यांचा पाहून नृत्यथाट

आनंद भरे अती अंतरात

सुखदायी हा किलबिलाट


मानवा , घेई तू आत्मबोध

दु:ख विसरून सुखास शोध

चिवचिवाट हा मनाचा मोद

पक्षी देती संदेश सुबोध 


मन करावे थोर, महान

अंगिकारणे लहान, सान

ठेवा इतरांच्या सुखाचे भान

देव देईल सदा आनंददान


Rate this content
Log in