STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

आंदण

आंदण

1 min
327



शिक्षणाचे देऊन आंदण

घडवी इतिहास महान

तुझा वारसा चालवता

आम्ही झालो बेईमान.....१


शिकून सावरून आज

बोली उपकारी भाषा

बाजारू समाजसेवेचा

वाजे तडम ताशा.......२


आम्हा चढली हो अशी

स्त्री मुक्तीची नशा

संस्कृतीच्या नावाखाली

लटक्या लक्तरांची भाषा.....३


दिलेला वसा घेऊनी

झाल्या स्वार्थांध शहाण्या

स्त्रीमुक्तीच्या छायेखाली

झाल्या विकृत कहाण्या......४


बोकाळले आज देशात

सामाजिक स्वैराचारी बल

मनमानी स्वभावाला

खोट्या पुरोगामीचे लेबल......५


देशबुडव्यांनी भरवला

शिक्षणाचा बाजार

बौद्धिक विकासास

जडला जर्जर विकार....६


देण्या जागृती आंदण

समाजात आणू एकी

अभिमाने जगी मिरवू

आम्ही सावित्रीच्या लेकी......७


Rate this content
Log in