आंधळे
आंधळे
1 min
262
दृष्टीहीन असे ते, हो तेच ते बुद्धीने पांगळे.
सगळं दिसूनसुध्दा, आम्ही डोळ्याने आंधळे.
जीव वाचवण्या जीवच घेती, वीरता काळोख हात झटकती.
वश करण्या भीती वापराती, लोककल्याणाची वरात मिरवीती.
श्रध्देचा हे, विनयभंग करती.
पाटाचे पाणी, कसेही वळवती.
तरीही आपण, भूलत असतो.
चुकीचा रस्ता, धरून बसतो.
उशिरा का होईना, चुकल्याचा भास होतो.
कारण आपण डोळे असूनही, आंधळे असतो.
