STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

आंधळा पाऊस

आंधळा पाऊस

1 min
396

कधी भिजवतो, कधी झुलवितो

कधी झाडे वेलींना झुकवितो

कधी जोराची गर्जना करतो

आंधळा पाऊस असाच पडतो।।1।।


कधी ना केली त्याने फिकीर कोणाची

असती जरी तरुवरी पिल्ले पक्ष्यांची

झाडे वेली संगे थैमान घालतो 

आंधळा पाऊस असाच पडतो।।2।।


ना कधी ओळखिशी गुरे वासरे

असतील जरी रानामधली रानपाखरे

कधी शेतावर कधी डोंगरावर कोसळतो

आंधळा पाऊस असाच पडतो।।3।।


टाकुनी आभाळी विळखा इंद्रधनूचा

प्रेमाच्या मिलनासाठी हपापलेला

मग तो धरणीला कवेत घेतो

आंधळा पाऊस असाच पडतो।।4।।


Rate this content
Log in