आंबा
आंबा
1 min
495
कोकीळा गाते
कुहू कुहू गाणी
मोहोरला आंबा
माळच्या रानी
मोहोराच्या खोड्या
काढू नको रे वाऱ्या
मोहोराच्या बनू दे
खट्यामिठ्या कैऱ्या
कैऱ्यांच्या फोडींना
तिखट मीठ लावू
चटक मटक कैऱ्या
चवी चवीने खाऊ
कैऱ्यांना येवू द्या
झाडावरच पाड
पिकल्या आंब्यांनी
भरु दे सारे झाड
दगडांनी नका करु
कैऱ्यांना तुम्ही इजा
कैरी पिकता मिळेल
फळांचा गोड राजा
आंब्यांच्या कोयीला
मातीत पुन्हा पुरु
कोय रुजता मातीत
तग धरेल नवे तरु
तरुला पाजू या रे
काळजीने पाणी
आंबा पुन्हा बहरेल
माळावरच्या रानी !
