आम्रपाली
आम्रपाली
1 min
209
आम्रपाली नाव तिचे
रहाते ती केडगावला!!
मैत्रीण अशी छान मिळाली
जीव माझा वेडावला!!
दिसते नेहमी गोड
जसा की माझा गुलाबजामुन!!
हवी कायम हिची मैत्री
घेईन मी तिला सामावून!!
साडी असो अथवा ड्रेस
दिसतो तिला शोभून!!
खुश रहाते नेहमी
बेफान डान्स करून!!
स्वभावाने मृदू अशी
मदतीला कायम तत्पर!!
मैत्रीण अशी मिळाली
जपेन तिला निरंतर!!
नूतन आम्रपाली
समीकरण जुळले!!
मैत्रीच्या या नात्यामध्ये
धागे कसे मिळले!!
हास्य करून बोले
अचूक ओळखे मला!!
प्रिय अशी मला झाली
मेळ आमचा जमला
