आम्ही वारकरी
आम्ही वारकरी
1 min
28.2K
आम्ही वारकरी
वेध आम्हां आषाढीचे
पांडुरंगाच्या भैटीचे
नित्य
पाऊले अमुची
चालती पंढरीची वाट
चंद्रभागेचा काठ
नयनी
टाळ ,चिपळ्या
तुळशीचे रोप डोई
मृदंगाने येई
हुरूप
कंठी तुळशीमाळ
भाली शोभे अष्टगंध
नामस्मरण छंद
निरपेक्ष
ज्ञानबा ,तुकाराम
पाऊले धरती ताल
जाई मरगळ
देहाची
विठूचा गजर
होई दिंडीत अभंग
वारीचा सत्संग
सुखावित
मानी वारकरी
भक्ती हेच कर्म
वैष्णव धर्म
जीवनात
विठोबाच्या चरणी
करी समर्पणाचा भाव
अंतरीचा ठाव
पांडुरंगच
