STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी

1 min
298

अज्ञानाच्या काळोखास चिरून

पेटली क्रांतीज्योत एक

भाग्यवान आहे किती मी

म्हणती मला 'सावित्रीची लेक'।। १।। 


नको आधार या देहाला

नको कुणाची सहानुभूती

स्वबळावर विश्व जिंकण्या

सामर्थ्य निर्मिले आमुच्या हाती।। २।। 


गरुडाचे पंख अन्

रक्त संचारले अंगी

क्षितिजालाही घालू गवसणी

प्रभुत्व आमुचे जगी।। ३।। 


षंडांची जाळुनी लंका

स्री- शक्तीचा करूया जागर

'सावज' आम्ही होणार नाही

दुर्गा बनून करू संहार।। ४।। 


क्रांतीज्योत ही अखंड तेवण्या

प्रयत्नांत अमुच्या एकी

समजू नका 'कमी' आम्हांस

आम्ही आहोत 'सावित्रीच्या लेकी' ।। ५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन