आम्ही लेकरे
आम्ही लेकरे
1 min
124
अज्ञान आम्ही लेकरे तुझी तू सर्वांचा पिता,
नियमाने तुच नमिता गातो तुझ्या गुणांच्या कथा,
सूर्य चंद्र हे तुझेच देव, तुझी गुरेवासरे,
तुझीच शेती, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे,
अनेक नावे तुला तुझेच दाही दिशांना घर,
करितो देवा सारखीच तू माया सगळ्या वर,
खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी,
हौस एवढी पुरव देवा हीच एक मागणी.....
