STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

4  

.प्रमोद घाटोळ

Others

आम्ही झोपडीत राजे

आम्ही झोपडीत राजे

1 min
183

भुकेला आनंद वाटे

या झोपडीत माझ्या

धन सोडून गेले

गोडवा भाकरीत माझ्या


ताटात गंध सुगंधी

मन शुद्धीच्या निशाण्या

सरणात भागीदारी

भिंती अशा दिवान्या


चिंता न वाहे फुकाची

आम्ही झोपडीत राजे

घेतो निद्रा सुखाने

पाहुनी महाल लाजे


नसे कधीच भिती

इथे चोर चपाट्यांची

तिजोरी भरून सांडे

शिगोर सौख्य चांदण्यांची


मुखी खिन्नता कुणाच्या

इथे कदाच नाही

प्रिती मोहरल्या सुखांची

माझी झोपडी ग्वाही


Rate this content
Log in