त्या दोघी
त्या दोघी


त्या दोघी तशा सख्ख्या बहिणी
एक आई खंबीर कडक, तर दुसरी सोशिक बालक
आईचा आधार असे जसा मुलीस,
मुलीचा सहवास पूर्णत्व देत असे आईस
दोघी भिन्न भिन्न आयुष्य जगल्या जरी,
मनाने त्या अंतरल्या नाही कधीही तरी
झाल्या दोघी भरल्या घरच्या सुहासिनी,
तरी त्या सदैव उभ्या एकमेकी लागुनी
खांद्यावरचा तो घरंदाज पदर,
बोलण्याची ती सुरेख अदब
कष्ट करुनी अपार नाती सदा सांभाळली,
मुले आणि नातवंडांनी घरे त्यांची भरलेली
हव्यास नाही कधी कशाचा,
साठवणीला मात्र असे ताफा माणसांचा
आयुष्याच्या चढ उतारावर अपेक्षा त्यांच्या तसूभर,
कर्तव्य मात्र केली अपार
वृक्ष बहरले उत्तुंग झाले आणि पसरले
तरी त्यांचे असणे त्या मुळांनीच आधारले