आम्हाला अंधश्रद्धेवरच जगायचंय
आम्हाला अंधश्रद्धेवरच जगायचंय
म्हणूनच तर दाभोळकरांसारख्या सुधारकांना मारायचंय...
जग जरी 21व्या शतकाकडे झुकले असले तरी
आम्हाला प्रिय आमच्या अनिष्ट रूढी
आमची भोंदूगिरी चालतीय ना
जनतेचं काय का होईना
आमचा स्वार्थ साधतोय ना
म्हणून आम्ही जुनेच धरून ठेवणार
तुमच्या जीवावरच तर आमची चलती
आमच्यावरच तर लोक विसंबून राहती
मांजर आडवी गेली तरी
आमचं नाही अडायचं काही
हा, तुम्हाला मात्र नाट लागणार भाई
का तुम्ही आमच्या पोटावर पाय आणता?
कोंबडा, बोकड देतात तर का अडवता?
मायबाप हो आम्ही बिचारे गरीब गाय
पण आमचाच जोर चालणार हाय
पोरगा पाहिजे तर द्या ना बोकड
रात्री 12ला या ना स्मशान घाटावर
मी मात्र तुमचं हितच चिंतनार...
