STORYMIRROR

Kranti Shelar

Others

3  

Kranti Shelar

Others

आमचे नाशिक....

आमचे नाशिक....

1 min
402

आमचे नाशिक बघायला खूप मस्त 

जितक लांबून दिसतं तितकंच स्वस्त.....

येथे कोणीही एकटे नाही

अनोळखीही येथे मिळून-मिसळून राही.....


गोदावरी नदीच्या काठी 

वसलेलं हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र 

दख्खन पठारावरील 

सह्याद्रीचा पुर्व उतार 

हे याचे कार्यक्षेत्र......


बघण्यासारखे आहे खूप काही 

जो येतो येथे पाहताचक्षणी हरवून जाई....

प्रत्येक ठिकाण शक्य नाही येथे लिहिणे

पण शक्य असेल त्याने

आमची पांडवलेणी एकदा नक्की पाहणे.......


 मुंबई-पुण्याचा असेल की

 प्रसिद्ध वडापाव  

पण आमची नाशिकची मिसळ 

त्याला ना कुठले दुसरे गाव.......


इथला प्रत्येक रस्ता तुम्हाला 

तुमच्याच घरी सोडतो

अनोळखी व्यक्तीलाही

इथला प्रत्येक व्यक्ती 

अचुक पत्ता सांगतो.....


बाहेर कोठेपण जावो

पण ओढ मात्र 

नाशिकचीच लागते

जगातल्या कुठल्याही 

मातीत रमलो तरी

शेवटी पावले आपोआप 

या मातीकडे वळतात....


Rate this content
Log in