STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

आमचा ही एक जमाना होता

आमचा ही एक जमाना होता

1 min
142

बालपण आमचे मजेत गेले

आमचाही एक जमाना होता l

सगळ्याजणी रहायचो मिळून मिसळून

रुसवा फुगवा कधीच नव्हता l 1 l


नातेवाईकांची वर्दळ होती

सगळे कामानिमित्त यायचे l

भरलेले असायचे घर नेहमी

गोकुळच ते आम्हाला वाटायचे l 2 l


आई वडिलांनी शिकवले संस्कार

गुरुजींनी दिला शिक्षणाचा कानमंत्र l

मजा मस्ती केली भावा बहिणीसोबत

माणुसकीचे अनुभवातून कळाले तंत्र l 3 l


प्रत्येक खेळ मनसोक्त खेळलो

भांडलो कधी झाली कट्टी बट्टी l

शाळेत गृहपाठ केला नाही तर

गुरुजींच्या हातची खालली हातावर पट्टी l4


परिस्थिती होती बेताची तरी

खायला मिळायचा खाऊ खूप काही l

माणसांना होती माणुसकी तेंव्हा

बाजारात गेलो की पिशवी भरून येई l 5 l


टिंगल टवाळक्या केल्या

नावे ठेवली अनेकजणांना l

आठवणी अजूनही येतात बालपणीच्या

व्यक्त करते मनीच्या निर्मळ भावनांना l



Rate this content
Log in