आलीस तू आयुष्यात
आलीस तू आयुष्यात
आलीस तू माझ्या आयुष्यात
आयुष्य माझा स्वप्नमय झालं
बघता तुज प्रथमी
श्वास माझा गंधित झाला
शब्द माझे संगीतमय झाले
कविता लिहिता सुर माझे जुळून आले
डोळे मिटूनी जवळ तू ये माझ्या
मिठीत घेऊनी बघू दे एकदा तुला
स्पर्श तुझा वाटे रेशमी मला
मन बहरुनी जाता वारा हा सांगुनी गेला
पैंजणे तुझी सुमधुर वाजू लागली
ओळखीचे सुर तुझे मनात रुतून बसली
साथ तुझी असू दे, दूर नको जाऊस
प्रेमात पडलो तुझ्या गुरफटलोय मनात तुझ्या
नाही करमत आता तुझ्याविना
हा विरह नाही सोसवत मला
प्रेमात रंगलो तुझ्यात कळले मला ना काही
मेघ बरसुनी आले चिंब भिजलो मी
अखंड बसुनी प्रेमात तुझ्या
साथ मिळे मला ह्या दाटलेल्या नभांची
