आली गौराई अंगणी
आली गौराई अंगणी


भादव्याची जेव्हा सप्तमी यायची ,
घरी जाण्याची लगबग सुरू व्हायची.
मज ओढ माझ्या गौराईची,
तिज ओढ माझ्या पावलांची.
तिची सेवा करताना रात्र आमची जागायची,
घरच्यासोबत गौरीही मजला थोडी मदत करायची.
दारी आमच्या कुंकवाची पाऊले उमटतात ,
सडा रांगोळीने मग दाही दिशा सजतात.
बाप्पा माझा दोन गौरीमध्ये शोभतो ,
पिलवंडाच्या ऐटीने मखर मंदिरावांनी भासतो.
दुसऱ्या दिवशी पक्वान्नाची पंगत भारी असते,
केळीच्या पानावर पदार्थांची मांडणी खास असते.
तीन दिवस गौरी माझी सुखात विसावते,
निरोप देताना तिज डोळ्यात पाणी मात्र डबडबते.
यावर्षी गौरी माझी घरभर मला शोधत असणार,
भोळे माझ्या कुटुंबीयांच कौतुक मात्र करणार.
जास्त काही नाही मागत फक्त आशीर्वाद देऊन जा,
परत तुझी सेवा करण्याचे भाग्य मजला देऊन जा.