आली दिवाळी
आली दिवाळी
1 min
348
आला गं आला
आला सण वर्षाचा
अति हर्षाचा
दिवाळसणा
अंगणात पणत्या
झगमगत्या
तेल मर्दन
उटने सुवासिक
थाट कितीक
प्रभातकाली
शुद्ध अभ्यंगस्नान
सुगंधी छान
स्वागता सज्ज
रांगोळी सजलेली
ती नटलेली
तोऱ्यात उभा
आकाशदिवा दारी
शोभतो भारी
तोरण दारा
झुले गर्द हिरवे
डुले बरवे
गोड, खमंग
फराळ चवदार
चटकदार
हर्षोल्हासाचा
सण रोषणाईचा
नवलाईचा
दीपावलीचा
हर्षमयी पर्वाचा
सण सर्वाचा
