Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajashri Kamble

Others

3.4  

Rajashri Kamble

Others

आली दिवाळी

आली दिवाळी

1 min
330


आली दिवाळी, आली दिवाळी 

घेऊन आठवणींची झोळी || धृपद ||


सजणे नटणे तुझ्यासाठी 

बघावे एकदा तरी मला 

ह्या दिवाळीच्या सणाला 

हिच उत्कंठा माझ्या मनाला 

आली दिवाळी.........||१||


झलक एक माझी बघण्याला

होई जीवाची घालमेल किती 

कळतसे ते माझ्या मनाला 

मन जे गुंतले एकमेकांती

आली दिवाळी........||२||


फराळ दिवाळीचा खातांना 

सय येई तुझी हमखास 

लाडू बेसनाचा न चकली 

तुझी आवडती असे खास 

आली दिवाळी.....||३||


जरी तू आहेस परदेशी 

होऊ नको मनी उदासी 

जरी न भेट आपली घडे 

मन हे मनास येई भेटेसी 

आली दिवाळी .......||४||


गुंतता हृदय हे ,तमा नसे

आस मनाला भेटीची जरी 

भेटशील जेव्हा कधी काळी 

ती माझी दिवाळी, तीच होळी .....||५||            


Rate this content
Log in