आले मी घेऊनी माझी कविता
आले मी घेऊनी माझी कविता
1 min
202
वाट माझी चाललेली
वेडी वाकडी वळणाची
हाती घेऊनी कागद
आरंभ होतो पण शेवट नाही
ध्यास लागतो आयुष्याचा
उतरतो तो माझ्या लेखणीतून
अस्तित्व स्वतःचे लीहूनी
कोरत जाते मी अंतापरी
त्यात असते जीवन माझे
स्वतःला त्यात सजऊ बघते
शब्द माझे होतात कुंचले
रंग भरते त्यात भावनांचे
अस्तित्वाला बाधा नसते माझ्या
भाव त्यात उतरते लेखणीतून
ह्या अश्या काव्याची माझ्या
वाट चालते ती चालतच राहते
