STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

आला तो...!

आला तो...!

1 min
343

ग्रहण झाले एकदाचे

पार पडले

सारे सोपस्कार....

श्रद्धा अंधश्रद्धा

बाजूस सारून

केला नमस्कार....

कोण म्हणे

भौगोलिक घटना

कशाला महत्व द्यायचं...

कोण म्हणे

बरेच फरक पडतात

मग का सोडायच....

कोण म्हणे

काळजी घेऊन

उघड्या डोळ्यांनी पहा ..

कोण म्हणे

शुभ अशुभ असत

घरात जप करत बसा....

या द्वंद्वात

सारा दिवस गेला

आणि आज तो पुन्हा आला...

म्हंटले

रविराजा तुझे तेज

इतकेच काय ते सत्य....

बरे झाले तू

पुन्हा सारे अडथळे सारून

तेज घेऊन आलास....

खरोखरच

ग्रहणात एक मोठा

चमत्कार केलास.....

बांगडी घालून

साऱ्या जगताला

ताळ्यावर आणलास....

आता बघ

खरोखरच सारे

वठणीवर येतील...

गप्पगुमान आपले

नित्य जीवन

सुखाने जगातील....!


Rate this content
Log in