आला श्रावण
आला श्रावण
1 min
27.2K
आला श्रावण महिना
साज नवा चढविला
गावू गाणे आंनदाचे
फुले वाहूया शिवाला।।
आला श्रावण खुशित
मेघ मल्हार सावळा
दिसे पाऊस निळा
न्हावू घाले धरनीला।।
आला श्रावण सरींचा
मन ओले-ओले होई
मन वाहे आकाशात
त्यात रमुनीया जाई ।।
वाटिकेत फुलांचा या
आला बार श्रावणात
गंध मातीचा भरला
तनमन सुवासात ।।
अंगणात भावणांच्या
जळमटे श्रावणात
चांदण्याचा झुलतोय
झुला हा संकल्पनेत।।
पाऊसाची रिमझिम
झाला हिरवा निसर्ग
नाचू लागलीत मोर
श्रावणात हा संसर्ग।।
शोभे अलंकार अंगी
सजे स्त्रीया या तेजस्वी
हाती घेवूनीया परडी
गौर दिसे ही ओजस्वी।।
