Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Others

4.0  

Vimal Patkari

Others

आला पर्जन्यराजा!

आला पर्जन्यराजा!

1 min
202


सोबत घेऊनी मेघांचा वाजा 

गरजत बरसत आला पर्जन्यराजा

लख्खउनी व्योम सारे चपळ विजांनी

कृष्ण धवल मेघातून आली वर्षारानी!!


आकाशी आले ढग काळे 

गर्जनेने कडकड कडाडले

सुटला मधुर मंद वारा

अंगाला येई शहारा

काळेकाळे ढग पाहून मयूर राजा

आनंदाने नाची फुलउनी पिसारा !!


रपरप सपसप आला हा पाऊस 

ओहळ निर्झर नाले लागले वाहू 

बाल गोपाल सारे नाचुनी 

ओढ्यात लागले नावा सोडू 

पर्जन्याची सारी मौजमजा लुटुनी

चिंब चिंब भिजुनी पाण्यात नाहती !!


वर्षाराणीची सर ही थांबली

पश्चिमेला ही सांज खुलली

पिवळ्या तांबूस किरणांनी

सृष्टी ही सोनेरी झाली

सप्तरंगी साथ साथीला घेऊनी 

इंद्रधनु हा भरभर आला गगनी!!


Rate this content
Log in