STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

आला पहिला पाऊस (काव्यांजली)

आला पहिला पाऊस (काव्यांजली)

1 min
187

पहा पुन्हा

आला पहिला पाऊस

केलेला नवस

बळीराजा.......१


धरती नटेल

लेईल शालू हिरवा

घुमेल पारवा

रानात.......२


रिमझिम बरसे

मन होते आनंदित

होते खळाळीत

ओहोळ.....३


दिसे इंद्रधनु

वर नभी आकाशात

होते प्रभात

प्रसन्न........४


येते आठवण

मग तीची अशी

कप बशी

चहाची.....५


उन्हाळा सरता

चाहूल ती लागते

मागणे मागते

धरती......६


Rate this content
Log in